जळगावच्या अर्चित पाटीलने तयार केलेल्या पीपीएच् किटला मिळाले पेटंट
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२२ । शहरातील विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी अर्चित राहुल पाटील या विद्यार्थ्याने पीपीएच् किट तयार करून पेटंट मिळवले आहे. त्याच्या या शोधाची नोंदणी भारतीय पेटंट कार्यालयांत झाली असून त्यासाठी अनुदानही मिळाले आहे.
अर्चित पाटील याचा हा शोध भारतीय पेटंट जर्नलमध्ये प्रकाशित झाल्यानंतर एक वर्षभरात कोणीही त्यावर हरकत घेतली नाही. त्यामुळे त्याचे पेटंट अर्चित यास मिळाले आहे. पीपीएच किट हे प्रसूतीदरम्यान रक्तश्राव मोजण्याचे साधन आहे. या पीपीएच् चा वापर करून डॉक्टरांना अनेक मातांचे प्राण आता वाचवता येणार आहेत. या नवीन उपकरणासाठी त्याला शिक्षक आणि पालकांचे मार्गदर्शन लाभले आहे.
अर्चित पाटील याने यावर्षी दहावीची परीक्षा दिली आहे. त्यांचे हे यश वाखाणण्याजोगे आहे. यासाठी त्यांना केवळ जळगावातील लोकांकडूनच नव्हे, तर जगभरातील शास्त्रज्ञांकडून त्याची प्रशंसा होत आहे.