⁠ 
रविवार, मे 19, 2024

एरंडोल तालुक्यातील सर्व ६५ गावांची पैसेवारी ५० च्या आत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१। एरंडोल तालुक्यातील खरीप पिकांची हंगामी पैसेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात तालुक्यातील सर्व ६५ गावांची पैसेवारी पन्नास पैशाच्या आत दाखविण्यात आली आहे. ६५ गावांपैकी १३ गावांची पैसेवारी ४७, २० गावांची पैसेवारी ४९ तर उर्वरित गावांची पैसेवारी ४८ दाखविण्यात आली आहे.

यावर्षी झालेल्या पावसाने एरंडोल तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले होते. यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यंदा कापसाला चांगला भाव मिळत असला तरी उत्पादन मात्र कमी झालेले असल्याने चांगला भाव असूनही शेतकऱ्यांना त्याचा काही एक फायदा होणार नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, प्रशासनाकडून एरंडोल तालुक्यांतील गावांची पैसेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात तालुक्यातील सर्व ६५ गावांची पैसेवारी ५० च्या आत जाहीर झाल्यामुळे तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अंतिम पैसेवारी सुद्धा अशीच कायम राहावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

अशी आहे गावनिहाय पैसेवारी
एरंडोल ४८, विखरण ४८, चोरटक्की ४८, पिंपळकोठा बुद्रुक ४८, पिंपळकोठा खुर्द ४९, पिंपरी बुद्रुक ४९, पिंप्री (प्र.चा) ४९, धारागीर ४८, खडके खुर्द ४८, खडकेसिम ४९, गणेश नगर ४९, भालगाव बुद्रुक ४८, नंदगाव बुद्रुक ४९, पातरखेडे ४८, टोळी खुर्द ४९, जवखेडा खुर्द ४९, जवखेडा बुद्रुक ४८, कासोदा ४७, आडगाव ४७, फरकांडे ४७, जान फड ४७, मालखेडे बुद्रुक ४८, उमरे ४७, नानखुर्दे ४७, जळू ४७ पळासदळ ४९, हनुमंतखेडे बुद्रुक ४८, हनुमंतखेडे मजरे ४८, वनकोठे ४७, बांभोरी खुर्द ४९, सोनबर्डी ४८, उत्राण (आ) ४९, उत्राण (गु) ४९, तळई ४९, अंतुर्ली खुर्द ४९, निपाने ४९, गालापूर ४८, मुगपाठ ४७, आनंदनगर ४८, जवखेडे सिम ४९, ताडे ४९, ब्राह्मणे ४८, आंबे ४८, हनुमंतखेडे सिम ४९, भातखेडे ४९, पिंपरीसिम ४९, वाघळुदसिम ४८, रिंगणगाव ४७, पिंपळकोठा (प्र.चा) ४८, वैजनाथ ४७, टाकरखेडा ४८, उमर्दे ४८, खडके बुद्रुक ४७, खेडगाव ४७, कढोली ४८, खेडी खुर्द ४८.