जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२१ । भडगाव पृथ्वीच्या पाठीवर केवळ मानवालाच हास्याची परमेश्वराने देणगी दिली आहे, तिचा मनमुराद उपयोग केल्यास मानवास चिंता, त्रास यापासून मुक्ती मिळू शकते. म्हणून प्रत्येकाने हसले पाहिजे. हसणे हे निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. मानवाच्या जीवनात असलेल्या ताण-तणाव यावर हास्य हे जालीम औषध आहे, असे प्रतिपादन राजेंद्र भंडारी यांनी केले.

भडगाव येथील केशवसूत ज्ञानप्रबोधिनी आयोजित व्याख्यानमालेत राजेंद्र भंडारी बाेलत हाेते. व्यासपीठावर डॉ. नीलेश पाटील, निवृत्त मुख्याध्यापक सुनील पाटील, जिल्हा परिषद सदस्य स्नेहा गायकवाड उपस्थित होते. यावेळी भंडारी यांनी हास्याचे विविध प्रकार उपस्थित श्रोत्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले व त्यातून मिळणारे लाभ सांगितले. सूत्रसंचालन प्रा.डॉ. अतुल देशमुख यांनी तर डॉ. विलास देशमुख यांनी आभार व्यक्त केले. यावेळी भंडारी म्हणाले की, महिला लवकर व भरपूर हसतात व रडतात ही, त्यामुळे त्यांच्यात पुरुषांपेक्षा हृदयविकाराचे प्रमाण कमी आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

हे देखील वाचा :







