वृद्धास अज्ञात वाहनाने चिरडले

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२२ । महामार्गावरुन पायी चालत असलेल्या एका वृद्धास अज्ञात वाहनाने चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारस नशिराबाद गावाजवळ झाला.
विश्वनाथ लक्ष्मण राणे (वय ७०) असे मृत वृद्धाचे नाव आहे. राणे हे सुरक्षारक्षकाचे काम करीत होते. मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास कामावरून घरी पायी असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषीत केले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाइकी रुग्णालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी प्रचंड आक्राेश केला.