अखेर महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांचं नाव समोर; कोण आहेत??

सप्टेंबर 11, 2025 3:53 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२५ । भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यामुळे सीपी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान त्यानंतर महाराष्ट्राचा राज्यपाल कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

Acharya Devvrat

आता महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत हे कार्यभार पाहणार आहेत. आचार्य देवव्रत हे गुजरातचे राज्यपाल आहेत. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

कोण आहेत आचार्य देवव्रत?

आचार्य देवव्रत हे एक शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी आहेत, ते सध्या गुजरातचे राज्यपाल आहेत. दरम्यान ते यापूर्वी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल देखील होते. आचार्य देवव्रत हे हिमाचल प्रदेशचे जवळपास चार वर्ष राज्यपाल होते. 2015 पासून ते 2019 पर्यंत ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. त्यानंतर ते 2019 मध्ये गुजरातचे राज्यपाल झाले, आता त्यांच्याकडे महाराष्ट्राचा देखील पदभार सोपवण्यात आला आहे. आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories