⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | अमळनेर येथे आढळलेल्या अर्भकाच्या मातेचा पोलिसांनी सहा तासातच लावला शोध

अमळनेर येथे आढळलेल्या अर्भकाच्या मातेचा पोलिसांनी सहा तासातच लावला शोध

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२१ । अमळनेर बसस्थानकातील शौचालयाजवळ स्त्री जातीचे जिवंत अर्भक आढळून आल्याची घटना रविवार दि.३१ रोजी घडली होती. दरम्यान, या अर्भकाच्या मातेचा शोध घेण्यात पोलिसांनी यश आले असून या महिलेवर सध्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याने, तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

अमळनेर बसस्थानकाच्या शौचालयाजवळ स्त्री जातीचे अर्भक जखमी अवस्थेत आढळून आल्याची घटना रविवार दि.३१ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली होती. दरम्यान, या बाळाच्या आईचा पोलिसांनी अवघ्या सहा तासात शोध घेतला असून ती महिला चांदणीकुऱ्हे (ता.अमळनेर) येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या या महिलेवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याने तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

धुळे येथे झाली प्रसूती
घटनेनंतर पोलिस निरीक्षक जयपाल हिरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र दिवे यांच्या पथकाने तपासचक्र फिरवून बाळाच्या आईचा शोध घेतला. शनिवारी ग्रामीण रुग्णालयात ही महिला आपल्या तपासणीसाठी आली होती. तेथे तिला नातेवाईकांसोबत धुळे जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर त्या महिलेची धुळे येथे शस्त्रक्रिया करून प्रसूती करण्यात आली. मात्र महिला व तिच्या वडिलांनी धुळे जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांना चुकवून पळ काढला होता व अमळनेर बसस्थानकात शौचालयाजवळ हे अर्भक टाकून दिले होते. त्यामुळे अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

बाळाच्या प्रकुतीत सुधारणा
नवजात मुलीवर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून, तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. अमळनेर पोलिस दलातील कॉन्स्टेबल नम्रता जरे या त्या मुलीची काळजी घेत आहेत. दवाखान्यात थांबून त्या बाळाला आईची माया देत आहेत.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.