जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२२ । पुणे जिल्ह्यात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अमळनेर शहरातून फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आली आहे. याबाबत एकावर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात एका गावात १७ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. अमळनेर येथे तिचे बारावीची परिक्षा असल्याने मुलगी ही आई भाऊसह अमळनेर येथे मामाच्या घरी आले होते. ६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पुणे येथील राहणारा रावसोहब पांडूरंग साळुंखे याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले.

याबाबत पीडीत मुलीच्या आईने अमळनेर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी रावसाहेब पांडूरंग साळुंखे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विलास पाटील हे करीत आहे.
हे देखील वाचा :
- जळगावातील निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्त्वाची सूचना; तात्काळ KYC पूर्ण करा, अन्यथा..
- पारोळ्यातील बाधित भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटलांसह जलसंपदा मंत्र्यांनी केली पाहणी
- अनुसूचित जाती व नवबौद्ध बचतगटांसाठी खुशखबर; मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार ९० टक्के अनुदान
- जळगावात एफडीएची धडक कारवाई ! ५ हॉटेलचे परवाने निलंबित, ३८ लाखांचा गुटखा जप्त
- भुसावळमार्गे धावणार मुंबई–दानापूर एकेरी विशेष ट्रेन










