अकरावीत प्रवेश घेण्यासाठी अल्पवयीन मुलगी घराबाहेर पडली अन्..

जुलै 14, 2022 2:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२२ । रावेरच्या अजनाड येथील अल्पवयीन मुलगी अकरावीत प्रवेश घेण्यासाठी घराबाहेर पडली.दरम्यान तिला कुणी तरी अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. याबाबत रावेर पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2 jpg webp

रावेर तालुक्यातील अजनाड येथील अल्पवयीन तरुणी रावेर येथील कमलाबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये अकरावीचा प्रवेश घेण्यासाठी आल्यानंतर तिला कुणी तरी अज्ञातांनी फूस लावून पळवून नेले. ही घटना मंगळवार, 12 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात पीडीत मुलीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक दीपाली पाटील करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now