---Advertisement---
राजकारण जळगाव जिल्हा जळगाव शहर

महापौरांनी सलग दुसऱ्या दिवशी जळगाव ग्रामीणमध्ये समाजबांधवांशी साधला संवाद!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२२ । जळगाव शहर मनपाच्या महापौर जयश्री महाजन यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जळगाव ग्रामीणचा दौरा सुरु केला आहे. सलग दुसऱ्या दिवशी त्यांनी असोदा व शेळगाव येथे समाजबांधवांची भेट घेत संवाद साधला. तसेच जयंती उत्सव साजरा करीत असल्याने २५ हजारांची देणगी देखील महापौर जयश्री महाजन यांनी दिली.

IMG 20221029 WA0118 jpg webp

जळगाव शहर मनपाच्या महापौर जयश्री महाजन यांनी आपला मोर्चा जळगाव ग्रामीणकडे वळवला आहे. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधत महापौर जयश्री महाजन जळगाव ग्रामीणचा दौरा करीत आहेत.

---Advertisement---

शुक्रवारी महापौर जयश्री महाजन यांनी जळगाव ग्रामीण मतदार संघातील लेवा पाटील समाज बहुल भादली, नशिराबाद, जळगाव खुर्द या गावांना भेट देत समाजबांधवांशी चर्चा केली होती. शनिवारी महापौरांनी असोदा गावी समाजाच्या जेष्ठ सदस्यांसह सर्व समाज बांधवांशी चर्चा केली. कोरोनाची मरगळ दूर झाल्याने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती गावागावात जल्लोषात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले. सायंकाळी महापौरांनी शेळगावला देखील भेट दिली.

गावागावात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करीत जळगाव शहरात आयोजित कार्यक्रम आणि मिरवणुकीत देखील समाज बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले. प्रसंगी अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक संघाचे प्रदीप (बंडू) भोळे, मधुकर भंगाळे, निखिल रडे, सुरेश फालक आदींसह इतर समाज बांधव उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---