गुन्हेजळगाव जिल्हा
पाचोऱ्यात दुचाकीस्वार चोरट्यांनी लांबविले महिलेचे मंगळसूत्र

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२२ । जळगावात सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा धूम केली आहे. पाचोरा येथे एका पादचारी महिलेच्या गळ्यातून दोन दुचाकीस्वार चोरट्यांनी सोन्याची पोत लंपास केल्याची घटना दि.१० रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा शहरातील आर.ओ.नगरात राहणाऱ्या सारिका मनोज पाटील वय-३१ या दि.१० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास मुलीसोबत रेस्ट हाउस रोडने निकिता टेलर या दुकानाकडून पायी जात होत्या. दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून पळ काढला.
सारिका पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे करीत आहे.