जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२२ । रिक्षात बसलेल्या चार जणांनी ७२ वर्षीय वृद्धाच्या खिशातून जबरदस्तीने १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढल्याची घटना बुधवारी आकाशवाणी चौक ते विद्युत कॉलनीदरम्यान घडली. शेख जलील शेख इब्राहिम (वय ७२, रा. पंचशील नगर, तांबापुरा) असे वृद्धधाचे नाव आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

शेख जलील शेख इब्राहिम बुधवारी सकाळी ११ वाजता जाण्यासाठी आकाशवाणी चौकात थांबले होते तेथे रिक्षा चालकाने त्यांना कुठे जायचे असे विचारले. धुळ्याला जायचे असल्याचे सांगितल्याने आम्हीपण धुळ्यालाच चाललो असे सांगून रिक्षात बसविले. आधीच त्यात मागे तीन तीन जण बसले होते. शेख यांना मध्यभागी बसवून हातचलाखीने खिशातील दागिने काढून घेत शेख यांना विद्युत कॉलनीजवळ सोडून दिले. आपल्या खिशातील मंगळसूत्र गायब झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर रात्री शेख यांनी रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार धुळ्याला रिक्षातील चार जणांविरुद्धा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील तपास करीत आहेत.

हे देखील वाचा :
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त






