जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२२ । केसीई संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट एंड रिसर्च येथे पार पडलेल्या एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय नामांकित सीव्ही ड्रेगन ह्या संस्थेचे संचालक-ट्रेनर चिराग बच्छावत ह्यांनी आयएमआरच्या एमबीए आणि एमसीएच्या विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र दिला. त्यांनी सांगितले की जागतिक कंपनीत नोकरी प्राप्त करण्यासाठी पहिली अनिवार्यता ही एका चांगल्या रेज्युमेची असते आणि ते कसे बनवावे ह्यावर त्यांनी एक दिवसीय शिबिरातून मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवून त्यांनी वर्कशॉपमध्ये उपस्थित २१० विद्यार्थ्यांकडून प्रभावी रेज्युमे देखील बनवून घेतले. चिराग बच्छावत हे कलकत्त्याचे असून त्यांनी आयआयएम शिलॉंगच्या आणि आयआयएम अहमदाबादच्या धर्तीवर आयएमआरच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. आजच्या स्पर्धेच्या युगात उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना ज्या कसोटीतून आपली क्षमता सिद्ध करावी लागत आहे आणि त्यासाठी कसले प्रयत्न करायला हवे हे देखील त्यांनी ह्यावेळी सांगितले सूत्रसंचालन प्रा. जयश्री महाजन ह्यांनी तर प्रास्ताविक अकाडमीक डीन प्रा. तनुजा फेगडे ह्यांनी केले. ह्या राष्ट्रीय वर्कशॉपसाठी संचालिका प्रा. शिल्पा बेंडाळे ह्यांनी मार्गदर्शन केले तर ट्रेनिंग एंड प्लेसमेंट हेड प्रा. पुनीत शर्मा ह्यांनी नियोजन केले.
यशाची पहिली पायरी प्रभावी रेज्युमे ने घडते”– चिराग बच्छावत
Written By टीम जळगाव लाईव्ह