⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

ग्राहकांना दिलासा ! सोने दरात 1700 रुपयांची घसरण, पण..; जळगावातले आताचे भाव पहा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२४ । गेल्या आठवड्यात उच्चांकीवर पोहोचलेल्या सोन्याच्या किमतीने या आठवड्यात ग्राहकांना काहीसा दिलासा दिला आहे. सोबतच चांदीत देखील पडझड दिसून आली. या आठवड्यात सोने दरात १७०० रुपयांची घसरण नोंदवली आहे. मात्र, येत्या आठवड्यात सोने पुन्हा नवा उच्चांकी दर अर्थात ७५ हजार रुपये तोळ्याचा टप्पा गाठण्याचा अंदाज जाणकारांचा आहे.

या आठवड्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. दोन्ही धातूंमध्ये चढउताराचे सत्र होते. जळगावच्या सुवर्णपेठेत सोने दराने गेल्या महिन्यात चार ते पाच वेळा उच्चांकी दराचा नवा टप्पा गाठला. एप्रिल महिन्याच्या १ तारखेला ६९४०० रुपये तोळा असलेल्या सोन्याने १७ एप्रिलला आजवरच्या सर्वाधिक (७४२०० रुपये) उच्चांकी पातळी गाठली होती. तेव्हा सोने ४८०० रुपयांनी महागले होते.

महिनाभर सोने दराचा ग्राफ वरखाली होत होता. गेल्या २५ दिवसांत सोने ३१०० रुपयांनी वाढले आहे. गुरुवारी ७२५०० रुपये असलेले सोन्याच्या दरात पुन्हा ४५० रुपयांची वाढ होऊन शुक्रवारी प्रती तोळ्याचे दर विनाजीएसटी ७२,९५० रुपये झाले आहेत. हे दर पुन्हा वाढून येत्या आठवड्यात ७५ हजारांवर पोहचण्याचा अंदाज जाणकारांचा आहे.

दुसरीकडे या आठवड्यात चांदी दरात जवळपास २००० रुपयाची घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात चांदीचा दर विनाजीएसटी ८४००० रुपये प्रति किलोवर होता. तो सध्या विनाजीएसटी ८२,००० रुपये प्रति किलोवर विकला जात आहे.

ही आहेत प्रमुख कारणे
इराणने इस्त्राईलवर हल्ला केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थिनीने या महिन्यात सोन्याच्या दरात वाढ झाली. त्यापाठोपाठ फेडरल बँकेने व्याज दरात तीन ऐवजी दोन वेळा कपात करण्याची बातमी आली. त्यामुळे सोने दरात घसरण होत होती. परंतु, त्याला दुजोरा न मिळाल्याने पुन्हा दरवाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.