दारुड्याने केली घरावर दगडफेक, घर मालकाला म्हणाला..जा तेरेसे जो होगा वो कर ले हम ने मारे पथ्थर

जुलै 4, 2022 1:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । दारूच्या नशेत असलेली व्यक्ती केव्हा काय करेल याचा नेम नाही. एका दारुड्याने चक्क घरावर दगड फेक केली. दरम्यान, घर मालकाने याचा जाब विचारला असता. त्याने घर मालकाला ‘जा तेरेसे जो होगा वो कर ले हम ने मारे पथ्थर म्हणत धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

crime 19 jpg webp

हमीदाबी शेख तस्लीम (वय ४५ रा. तांभापूर बिस्मिल्ला चौक जळगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. संशयित आरोपी दिन्या (पूर्ण नाव माहित नाही) सोबत एक इसम यांनी दारूच्या नशेत काही एक कारण नसताना फिर्यादच्या घरावर दगडफेक केली. फिर्यादीने याचा जाब विचारला असता. दारुड्याने जा तेरेसे जो होगा वो कर ले हम ने मारे पथ्थर म्हणत धमकी दिली. याबाबत तस्लिम यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली.

घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे यांनी भेट दिली. त्यानुसार भा.कलम ३३७,५०६,५१० प्रमाणे सदर संशयित आरोपी विरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नितीन पाटील करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now