डॉक्टरने मागितले उधारीचे पैसे अन झाला विळ्याने हल्ला

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२३ । उधारीचे पैसे मागितल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे येथील डॉक्टरांवर एकाने विळ्याने वार केल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे.

अधिक माहिती अशी कि, उचंदा येथील डॉ. विजय भास्कर जाधव ( पाटील ) यांची सुकळी येथील ब्रिजलाल सूर्यभान पाटील यांच्याकडे उधारी बाकी होती. या उधारीचे पैसे मागितल्याचा राग आल्यामुळे त्याने डॉ. विजय भास्कर जाधव ( पाटील ) यांच्यावर विळ्याने वार केला. यात ते जखमी झाले.

या संदर्भात डॉ. विजय भास्कर जाधव ( पाटील) यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार, मुक्ताईनगर पोलीस स्थानकात भा.दं.वि.कलम ३२४,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार आसीम तडवी हे करीत आहेत