कारची ट्रकला धडक; वाहनाच्या काचा फोडून केली मारहाण

एप्रिल 29, 2022 2:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२२ । भरधाव कारने ट्रकला धडक दिल्याची घटना घडल्यानंतर कारचालकाने ट्रकचालकाला मारहाण करून दुखापत केली आणि त्यानंतर उभ्या ट्रकच्या काचा फोडल्याची घटना शहरातील इच्छादेवी चौकात २७ रोजी घडली होती याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 15 jpg webp

शहरातील इच्छादेवी चौक ते कालिंका माता चौकादरम्यान कारने मालट्रकला धडक दिल्याची घटना घडली होती. या घटनेत कारचालकाने ट्रकचालकाला मारहाण करुन जखमी केले होते. याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील हिंगणेखुर्द येथी चालक प्रविणलाल चंदू बाविस्कर हे त्यांच्या ताब्यातील एम.एच.३० बीडी ३५०५ हा घेवून जळगावमार्गे मनमाडकडे जात होते. यादरम्यान २७ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास जळगावात इच्छादेवी चौक ते कालिंका माता चौकादरम्यान ट्रकला एम.एच.१५ एफ एन ००९८ या क्रमाकांच्या कारने धडक दिली. या धडकेत ट्रकचे बोनेट तुटून नुकसान झाले. यानंतर कारचालकाने ट्रकचालकाला ओढून मारहाण केली तसेच दगडाने ट्रकच्या काचा देखील फोडून नुकसान केले होते. अशी तक्रार ट्रकचालक प्रविणलाल बाविस्कर यांनी एमआयडीसी पोलिसात दिली. त्यावरुन कारचालकाविरोधात २८ रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अल्ताफ पठाण हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now