⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | अमळनेर आगारातील बस चालकाला हृदयविकाराचा झटका

अमळनेर आगारातील बस चालकाला हृदयविकाराचा झटका

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२१। जळगाव फेरी पूर्ण करून अमळनेर आगारात परतलेल्या व कॅबिनकडे पायी जात असलेल्या चालकाला कॅबीनच्या प्रवेशद्वारातच हृदयविकाराचा झटका आल्याची घटना मंगळवारी घडली. चालकाला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याठिकाणी अतिदक्षता विभागात सुरु आहेत.

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आलेला असताना मंगळवार दि.७ रोजी अमळनेर आगारातील १० कर्मचारी सेवेत हजर झाले. अमळनेर आगारातील चालक प्रवीण विनायक पाटील हेदेखील मंगळवारी कामावर हजर झाले होते. जळगाव फेरी पूर्ण केल्यानंतर चालक प्रवीण पाटील यांनी अमळनेर आगारात प्रवाशांना उतरवले. त्यानंतर कॅबिनकडे जात असताना ते कॅबिनच्या प्रवेशद्वारात कोसळले. यावेळी वाहक राजेंद्र चौधरी यांनी इतरांच्या मदतीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर त्या ठिकाणी अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक आहे.

तीन मार्गावर ६ फेऱ्या
मंगळवार दि.७ रोजी अमळनेर आगारातील १० कर्मचारी सेवेत हजर झाले. त्यामुळे अमळनेर आगारातून जळगाव मार्गावर दोन, चोपडा मार्गावर एक, तर पारोळा मार्गावर तीन अशा एकूण सहा बसफेऱ्या झाल्या. यात जळगाव आणि पारोळा मार्गावरील फेऱ्यांना प्रवाशांचा समाधानकारक प्रतिसाद मिळाल्याचे आगार प्रशासनाकडून सांगण्यात आले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.