सर्पदंशाने बैलाचा जागीच मृत्यू, तर दुसरा बैल चोरी

ऑक्टोबर 30, 2021 12:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२१ । शिरुड ( ता. अमळनेर ) येथील घराच्या अंगणात बांधलेल्या बैलाला सर्पदंश झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २८ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. भैय्या पाटील यांच्या घराच्या अंगणात बांधलेली बैल जोडी मधील एक बैल रात्री चोरांनी सोडून नेला होता.तर त्याच जोडी मधील एका बैलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Untitled design 14 jpg webp

सविस्तर असे की, अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील रहिवासी भैय्या साहेबराव पाटील यांच्या अंगणात त्यांचा मालकीचा बैल बांधलेला होता.परंतु, सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बैल अचानक जागेवर पडल्याचा आवाज आल्याने त्यांनी बाहेर येऊन बघितले असता बैल त्यांना निपचित पडलेला दिसला. व त्याच्या तोंडातून फेस निघत असल्याने कोणत्यातरी विषारी जातीच्या सर्पाने त्यास दंश केला असल्याने बैल जागीच गतप्राण झाला होता.

मागील काही दिवसापासून भैय्या पाटील यांच्या घराच्या अंगणात बांधलेली बैल जोडी मधील एक बैल रात्री चोरांनी सोडून नेला होता. तर त्याच जोडी मधील एका बैलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने ऐन शेतीच्या कामांची लगबग असतांना बैलाची जोडी गमविल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now