भुसावळात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२२ । भुसावळ येथील लोहमार्ग पोलिसांना 40 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला असून ओळख पटवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. खांबा किलोमीटर क्र. 445/14/16 जवळील नाल्याजवळ 2 जून रोजी ही महिला मयत स्थितीत आढळली.

crime 2022 06 07T133849.937 jpg webp

ओळख पटवण्याचे आवाहन
उंची पाच फूट, नाक सरळ, रंग काळा-सावळा, शरीरबांधा सडपातळ, डोक्याचे केस काळे, चेहरा लांबट, उजव्या हाताच्या मनगटावर सी.एन.मारावती सिनामसिंह असे गोंदलेले आहे. अंगात पिवळ्या रंगाचा पेटीकोट, अंगात राखाडी व मळकट रंगाचा पंजाबी कुर्ता असे वर्णन आहे. मयताची ओळख पटत असल्यास भुसावळ लोहमार्ग पोलिसांशी तसेच नाईक प्रवीण राजगुरे (7038089615) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now