खळबळजनक : मातेसह दोन चिमुकल्यांचा विहिरीत मृतदेह आढळला

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । मातेसह दोन चिमुकल्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही थरारक घटना चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे उघडीस आली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

well in death

ईला मनोज पावरा (वय २५), रितेश मनोज पावरा (वय ५) व महेश मनोज पावरा (११ महिने ) असे मातेसह मृत अवस्थेत आढळन आलेल्या चिमुकल्यांचे नाव आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील मनोज पावरा हे वरील ठिकाणी कुटुंबासह वास्तव्यास आहे.  घरात हलाखीची परिस्थिती असल्याने सदर पावरा दाम्पत्य ठिकठिकाणी कामे करून आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह करीत असतात. ते गेल्या महिन्यातच तालुक्यातील रांजणगाव येथे कामाला आले होते.

मात्र बुधवार, २९ रोजी रात्री १०:३० वाजताच्या पूर्वी (वेळ निश्चित नाही) अचानक रितेश पावरा, महेश पावरा या चिमुकल्यांसह पत्नी ईला मनोज पावरा (वय- २५) यांचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला. मनोज बटू पावरा व बबलू नारसिंग पावरा यांनी लागलीच मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपास करून त्यांना मृत घोषित केले. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक लोकेश पवार करीत आहेत.

वसंतवाडीत आणखी एकाच्या पाण्यात बुडून मृत्यू
तालुक्यातील वसंतवाडी येथे देखील एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संजय पंडित मोरे (वय ३९) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांचे नातेवाईक योगेश गायकवाड यांनी मोरे यांना सिव्हिल मध्ये मृत अवस्थेत दाखल केले होते. याबाबत एम आय डीसी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. तपास विकास सातदिवे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now