
जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । माजी मंत्री एकनाथराव खडसे व ऍड.रोहीणी खेवलकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन मुक्ताईनगर तालुक्यातील दुई येथील विद्यमान सरपंच शुभम सुकराम कोचुरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

आज सकाळी सरपंच शुभम कोचुरे यांनी ग्राम पंचायत सदस्य संदिप जावळे, प्रदिप पाटील व काही कार्यकर्त्यासह माजी मंत्री एकनाथराव खडसे तसेच ऍड.रोहीणीताई खेवलकर यांची भेट घेतली. या प्रसंगी वडोदा येथील माजी जि.प.सदस्य सुभाष पाटील, नगराध्यक्ष प्रविण पाटील, माजी सभापती दशरथ कांडेलकर, नगरसेवक बापु ससाणे, ग्राम पंचायत सदस्य संदिप जावळे, प्रविण पाटील, सुकळी येथील कार्यकर्ते सुनिल कोळी आदी उपस्थित होते. दरम्यान माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शुभम कोचुरे यांचा सत्कार करुन घड्याळ भेट दिले.

हे देखील वाचा :
- ईद-ए-मिलादपूर्वी अमळनेरात पोलिसांचा ‘रूट मार्च’
- स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान
- गोदावरी अभियांत्रिकीच्या प्रा.डॉ. ललिता पाटील ’राष्ट्रीय नवोदय पुरस्कार २०२६’ सन्मानित
- स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
- रावेरमध्ये केबल चोरांचा धुमाकूळ! एकाच रात्री १५ ते २० शेतकऱ्यांना मोठा फटका






