⁠ 
सोमवार, मे 20, 2024

८३ वर्षीय आजी बाईने केली कोरोनावर मात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ एप्रिल २०२१ । कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजविला असतांना मात्र अमळनेर ग्रामिण रूग्णालयातून आज दि ६ रोजी ८३ वर्षीय आजी श्रीमती शकूंतलाबाई तूळशीराम सोनार या सूखरूप घरी परतल्या.

१० दिवसांपूर्वी शहरात कूठेही खाजगीत बेड ऊपलब्ध नसल्याने प्रांताधिकारी सिमा आहिरे, डॉ प्रकाश ताडे यांच्या सहकार्याने ईंदिरा भवनातील कोविड सेंटर मध्ये आजींचे ७० ते ७२ आँक्सीजन असतांना ३ दिवस ऊपचार केलेत आँक्सीजन पातळी वाढण्यासाठी ग्रामिण रूग्णालयात डॉ ताडे यांनी बेड ऊपलब्ध केला. आठवडाभरात आजींचे आँक्सीजन लेव्हल ९५ पर्यंत आले डॉ प्रशांत कूलकर्णी व ग्रामिण रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्यानेच ८३ वर्षीय आजीबाई आज घरी पोहचल्यात त्या बद्दल त्यांच्या नातेवाईकांनी सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच सहकारी डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

डॉ तनूश्री फडके डॉ शिरिन बागवान डॉ अशिष पाटील डॉ नरेंद्र पाटील डॉ परेश पवार हे ग्रामिण रूग्णलयातील वैद्यकीय स्टॉप व त्यांचे सहकारी अहोरात्र रूग्णांना सेवा देत आहेत. कोरोना महामारी ने नागरिकांमध्ये सद्या घबराहट पसरली आहे मात्र नागरीकांनी घाबरून जावू नये शासनाचे नियम पाळावे सद्याच्या ईंदिरा भवनातील कोविड सेंटर मध्ये ऊद्या पर्यंत सिलेंडर येतील व २३ बेड आँक्सीजनचे होतील ग्रामीण रूग्णालयातही ३३ आँक्सीजन बेड सद्या सूरू आहेत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून घाबरून न जाता काळजी घ्यावी.

-डॉ प्रकाश ताडे
वैद्यकीय अधिकारी ग्रामिण रूग्णालय अमळनेर