६ महिन्याच्या गर्भवती असलेल्या माहिलेला शिंदे गटाकडून मारहाण !

जळगाव लाईव्ह न्यूज : ४ एप्रिल २०२३ : फेसबुक पोस्ट केली या कारणावरुन ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. रोशनी शिंदे असं या महिला पदाधिकाऱ्याचं नाव आहे.यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे त्या सहा महिन्यांच्या गर्भवती आहेत असेही समजत आहे. मात्र अजून याप्रकरणी पोलिसांनी अजून एफआयआर दाखल केलेली नाही

ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे या सोमवारी संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतण्याच्या तयारीत होत्या. त्यावेळी ऑफिसच्या आवारात शिरुन त्यांना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली. असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. पोलिसांनी मात्र अजून एफआयआर दाखल केलेली नाही. .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात हि घटना घडली आहे.

तर दुसरीकडे आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केलं. युवती सेनेच्या पदाधिकारीवरती भ्याड हल्ला केला आहे. ती महिला प्रेग्नंट असतानाही तिला मारहाण केली आहे. जनेताला त्रास देण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप विचारे यांनी केला.