उत्तर महाराष्ट्रात ठाकरेंना बसणार जबर धक्का : हा नेता करणार ‘जय महाराष्ट्र’

जळगाव लाईव्ह न्यूज : १५ मार्च २०२३ : उत्तर महाराष्ट्र्रात ठाकरेंना अजून एक जबरधक्का बसणार आहे. शिवसेना नेते व माजी मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्यानंतर ठाकरेंना अजून एक जबर धक्का बसणार आहे. तो हि उत्तर महाराष्ट्रात

शिवसेना नेते व माजी मंत्री बबनराव घोलप यांची मुलगी तनुजा घोलप भाजपात प्रवेशाची तयारी करत आहेत.उत्तर महाराष्ट्रातील बडे नेते बबनराव घोलप यांची कन्या तनुजा घोलप यांचा लवकरच भाजप प्रवेश होणार आहे.

तनुजा घोलप यांनी या पूर्वीच एकनाथ शिंदेच्या गोटात जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता त्या भाजपमध्येच प्रवेश करणार आहेत. तनुजा घोलप या यापूर्वी एका वेळेस स्थानिक जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये, तसेच 2017 च्य नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत.