⁠ 
सोमवार, ऑक्टोबर 28, 2024
Home | जळगाव जिल्हा | मोठी बातमी ! चोपड्यातून ठाकरे गटाचा उमेदवार बदलला; प्रभाकर सोनवणेंना उमेदवारी

मोठी बातमी ! चोपड्यातून ठाकरे गटाचा उमेदवार बदलला; प्रभाकर सोनवणेंना उमेदवारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२४ । विधानसभा निवडणुकीसाठी चोपडा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे गटाकडून राजू तडवी यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण आता ठाकरे गटावर उमेदवार बदलाची नामुष्की आली आहे. ऐनवेळेस उमेदवार बदलवून भाजपमधून आलेले प्रभाकर सोनवणे यांना आता ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा एक दिवस बाकी असतानाच ही उमेदवारी आता प्रभाकर सोनवणे यांना देण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान ठाकरे गटाकडून ऐनवेळी उमेदवार कोणत्या कारणामुळे बदलविण्यात आला हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

चोपडा मतदार संघात मागील काळात लता सोनवणे या आमदार होत्या. यावेळी देखील महायुतीत हि जागा शिवसेना शिंदे गटाला सुटल्याने आता त्यांचे पती प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना महायुती कडून उमेदवारी देण्यात आली आहे. आता त्यांच्या विरोधात प्रभाकर सोनवणे उमेदवार असल्याने प्रभाकर सोनवणे हे कशी लढत देतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.