⁠ 

Telgi Scam : तेलगीच्या सहआरोपीची गुन्ह्याची कबुली

जळगाव लाईव्ह न्यूज । Telgi Scam । देशातील सर्वात मोठा मुद्रांक घोटाळा मानला जाणारा तेलगी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगीचा साथीदार असलेला रविचंदर अलिमुथू याने त्याच्यावरील आरोप मान्य केले आहेत. यावेळी त्याने पेट्रोल-डिझेल भेसळ घोटाळ्याचा आरोप मान्य केला आहे. सीबीआयच्या विरोधानंतरही विशेष न्यायालयाने त्याचा अर्ज मान्य करत त्याला दोषी ठरवले आहे.

तेअब्दुल करीम तेलगी हा प्रकरणात प्रमुख आरोपी होता. ज्याने २०१२ साली आपले सर्व गुन्हे मान्य केले. सात वर्षांच्या सश्रम कारावासासह ८० हजार रूपयांचा दंड सुनावला होता. त्यानंतर २०१७साली त्याचा मृत्यू झाला. मुद्रांक घोटाळ्याच्या तपासादरम्यान पेट्रोल आणि डिझेल भेसळ प्रकरण उघडकीस आले होते. हे प्रकरण ५०० टन नफ्याच्या आयातीशी संबंधित होते. अब्दुल करीम तेलगीचा साथीदार असलेला रविचंदर अलिमुथू याने या प्रकरणातील सर्व आरोप मान्य केले आहेत. विशेष सीबीआय न्यायाधीश एस. यू. वडगावकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देऊन अलिमुथूचा गुन्हा मान्य असल्याचा अर्ज मंजूर केला.