⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

Breaking: ८ हजारांची लाच घेताना तहसीलदार, तलाठीसह दोघे जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२२ । ८ हजाराची लाच घेताना बोदवड तहसीलदारांसह चौघे जळगाव एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे. लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बोदवड तहसीलदार योगेश टोणपे यांच्यासह त्यांचा वाहन चालक, तलाठी व एका खाजगी पंटराचा आरोपींमध्ये समावेश आहे.

बोदवड तहसीलदारांनी अवैधरीत्या वाळू वाहतूक चालू देण्यासाठी तसेच तक्रारदाराच्या डंपरवर कारवाई न करण्यासाठी यापूर्वी 24 हजार रुपये घेतले होते तर उर्वरीत पाच हजार रुपये तहसीलदार व चालकांसाठी तर दरमहा प्रमाणे तलाठ्याने तीन हजारांची मागणी केल्याने वाळू वाहतूक करणार्‍या व्यावसायीकाने एसीबीकडे तक्रार नोंदवली.

जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव व कर्मचार्‍यांनी सापळा रचला. सुरूवातीला खाजगी पंटराने लाच रक्कम स्वीकारली व नंतर त्याच्यासह तहसीलदार, तलाठी व चालकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या.