जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ मे २०२१ । कोविड काळात शिक्षक विविध कर्तव्य बजावत आलेले आहेत.विद्यार्थ्यांना ऑनलाइन, ऑफलाईन ज्ञानदानाबरोबर सर्वेक्षण,कोवीड शोधमोहीम, रेशन दुकानावर धान्य वाटप,पोलिसां सोबत बंदोबस्तात मदत,कोविड सेंटर मधील व्यवस्थापन, लसीकरणासाठी मदत इ. कामे शिक्षक करत आहेत.
कुठल्याही सामाजिक कार्यात शिक्षक तत्पर असतो.शिक्षक हा एक कोरोना योध्दा म्हणून कार्य करत असतांना अनेक शिक्षकांचे या कोरोना महामारीत कर्तव्यावर असतांना निधन झाले आहे.अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत तरी शिक्षक एक सामाजिक दायित्व म्हणून आपल्या परीने करोना ग्रस्तांना मदत करत आहेत.एरंडोल तालुक्यातील माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कोवीड-१९ संकलन निधी नावाचा व्हॉट्सअप गृप व्हि.टी.पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने तयार करुन सुमारे ९१००० रुपयांचा निधी जमा केला व त्यातून सात जम्बो ऑक्सिजन सिलेंडर खरेदी करुन त्यांचे एरंडोल ग्रामीण रुग्णालयाला लोकार्पण करण्यात आले.
सदर लोकार्पण सोहळ्याला प्रांतधिकारी विनय गोसावी,डॉ. कैलास पाटील मेडिकल ऑफीसर एरंडोल,जगदिश पाटील (विधानसभा क्षेत्र प्रमुख एरंडोल,)अमितदादा पाटील (अध्यक्ष य.शि.प्र.मं.एरंडोल)शालिग्राम गायकवाड (माजी.उपनगराध्यक्ष) डॉ मुकेश चौधरी,व्हि.टी.पाटील सर (संचालक जळगाव जि.माध्य.शिक्षक पतपेढी) एम.के.मराठे सर,आर.झेड.पाटील सर, शेखर पाटील सर, अहिरे सर,एम.ए.पाटील सर,ए.आर.पाटील सर, तालुक्यातील शिक्षक शिक्षकेत्तर बाधंव उपस्थित होते.सदर उपक्रमाचे समाजाच्या सर्व स्तरातून स्वागत होत आहे.सदर लोकार्पण सोहळ्याचे सुत्रसंचलन राजेंद्र पाटील सर (अध्यक्ष एरंडोल तालुका मुख्याध्यापक संघ )यांनी केले तर आभार एम.के.मराठे सर यांनी मानले.