गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

सप्टेंबर 7, 2026 6:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त विविध अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यंदाच्या शिक्षक दिनाची ‘टीचर्स क्रिएट मॅजिक’ ही संकल्पना विशेष आकर्षण ठरली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत वर्गात ज्ञानदान करण्याचा अनोखा अनुभव घेतला.

ge

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी, विभागप्रमुख व प्राध्यापकवर्ग यांचे विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ व शुभेच्छापत्र देऊन स्वागत केले.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह प्राचार्य, अधिष्ठाता व विविध प्रशासकीय जबाबदार्‍यांच्या भूमिकाही पार पाडल्या. शिक्षकाची भूमिका साकारताना विद्यार्थ्यांना अध्यापनासोबतच शिक्षकांच्या जबाबदार्‍या, आव्हाने आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासातील त्यांचे योगदान याची जाणीव झाली. दुसर्‍या सत्रात विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व, शिक्षक-विद्यार्थी नाते आणि शिक्षकांचे जीवनातील योगदान यावर मनोगत व्यक्त केले.

मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. शिस्त, कौशल्य आणि परिवर्तनातूनच उज्ज्वल भविष्य घडते. बदलत्या काळानुसार परिवर्तन स्वीकारून जागतिक स्पर्धेसाठी आवश्यक कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत, असे त्यांनी सांगितले. ‘टीचर्स क्रिएट मॅजिक’ संकल्पनेतून सक्षमीकरण आणि एक शाश्वत भविष्य यांचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.या उपक्रमाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील तसेच डॉ. वैभव पाटील यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागप्रमुख, फॅकल्टी कोऑर्डिनेटर्स, स्टुडंट कौन्सिल, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now