---Advertisement---
मुक्ताईनगर राजकारण

आव्हाड यांच्यावर विनयभंगाचे खोटे आरोप करणाऱ्या महिलेवर कार्यवाही करा, राष्ट्रवादीची मागणी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । जितेंद्र आव्हाड यांच्यावर महिलेचा विनयभंग प्रकरणी भा.दं.वि ३५४ कलम नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान याप्रकरणी मुक्ताईनगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निषेध व्यक्त करीत त्या महिलेवर कार्यवाही करण्यात यावी, अश्या मागणीचे निवेदन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

jalgaon 2022 11 15T185812.374

निवेदनात म्हटल्याप्रमाणे, मुख्यमंत्री एका पुलाच्या उद्घाटनप्रसंगी आले असता, जितेंद्र आव्हाड यांनी एका महिलेचा सन्मानपूर्वक व कुठलाही विनयभंगाचा हेतु मनात न ठेवता,महिला रिदा अजगर रशीद यांना स्वत:ला पुढे जाता यावे म्हणुन बाजुला सरकावले असता सदर महिलेने जितेंद्र आव्हाड यांचेवर राजकिय द्वेषापोटीभां.दं.वि ३५४ कलम नुसार गुन्हा विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. सबब आम्ही भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा उपाध्यक्ष रीदा अजगर रशीद यांचा जाहीर निषेध करतो.जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आलेल्या खोट्या आरोपासंदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. व आव्हाड साहेबांवरील खोटा गुन्हा ताबडतोब मागे घेण्यात यावा.अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

---Advertisement---

या प्रसंगी रऊफ बागवान,आसिफ बागवान,संजय कोळी,भैय्या पाटील,चेतन राजपुत, जुबेर अली,भावेव रायपुरे,स़दिप जुमले,अनिंस पटेल, रफिक शहा,बापु ससाणे,मोसिंन खान,रफिक मिस्तरी,सुमित तळेले,निलेश भालेराव,भुषण वानखेडे,रमेश मराठे,चेतन राजपुत,प्रदिप पाटील,रजमान भोसले,मधुवाना पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---