आमदार अमोल मिटकरी यांच्यावर कारवाई करा : ब्राम्हण समाज

एप्रिल 25, 2022 4:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी दोन दिवसांपूर्वी ब्राम्हण समाजबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी चोपडा ब्राम्हण संघाने केली. या बाबत बहुभाषिक ब्राम्हण समाजाने तहसीलदार अनिल गावित व पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना निवेदन दिले आहे.

pachora 6

आमदार अमोल मिटकरी यांनी सनातनी हिन्दु ब्राम्हण समाजातील पुरोहितांबाबत बेताल व आक्षेपार्ह वक्तव्य करून हिंदू विवाह परंपरेची बदनामी केली, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now