बातम्या

जळगाव जिल्ह्यात आज केवळ ४ नवे रुग्ण ; अनेक तालुके कोरोनामुक्तच्या उंबरठ्यावर

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२१ । मार्च ते मे महिन्यात थैमान घातलेल्या जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणत नरमला आहे. जिल्ह्यातील अनेक तालुके कोरोनामुक्तच्या उंबरठ्यावर येवून ठेपले आहे. आज सोमवारी जिल्ह्यात दिवसभरात ०४ नवीन रुग्ण बाधित आढळून आले आहे. तर ९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात एकही मृत्यूची नोंद नाहीय. आज जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाहीय.

corona update

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा उतरता आलेख कायम आहे जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव मार्च ते मे अशा दोन-अडीच महिन्यांमध्ये तीव्रतेवर होता. नंतर मात्र लाट ओसरायला सुरवात झाली आणि आता जुलैच्या अखेरीस सक्रिय रुग्णसंख्या शंभराच्या टप्प्यात येण्यापर्यंत संसर्ग नियंत्रणात आला आहे.  

जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १,४२,५६३ इतकी झाली आहे. त्यात उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या १ लाख ३९ हजार ९०१ वर आहे. जिल्ह्यात सध्या ८७ रुग्णांवर उपचार सुरू आहे. आज एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाहीय. जिल्ह्यात आज पर्यंत २५७५ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९८.१३ वर गेला आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर-०१, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ -०१, अमळनेर -००, चोपडा-००, पाचोरा-००, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-००, एरंडोल-०, जामनेर-००, रावेर -०, पारोळा-०, चाळीसगाव-०२, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण ४ बाधित रूग्ण आढळले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button