आरोग्य

शासकीय वैद्यकीय रुग्णालयात २०० दिव्यांगांची तपासणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२२ । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दि.३० मार्च रोजी दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे कामकाज पार पडले. यावेळी २०० लाभार्थ्यांनी उपस्थिती देऊन प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही पूर्ण केली. तपासणीचे कुपन दररोज कार्यालयीन वेळेत वितरित करण्यात येत आहे.

civil jpg webp

ज्या दिव्यांग बांधवानी ३० मार्चचे कुपन घेतले होते अशा २०० दिव्यांगांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी सकाळी ९ ते १ वाजेदरम्यान करण्यात आली. तपासणी मुख्य गेट नं. २ कडील अधिष्ठाता कार्यालयासमोरील दिव्यांग मंडळाच्या कार्यालयात तसेच ओपीडी कक्षात झाली. नेहमी दिसणारी गर्दी हि मर्यादित झाली. दर बुधवारी होणारी गर्दी आणि गैरसोय पाहता दिव्यांग मंडळाने सुरु केलेल्या आगाऊ बुकिंग कुपन प्रणालीला चांगला उदंड प्रतिसाद लाभत आहे.

उपअधिष्ठाता तथा दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारुती पोटे, मंडळाचे सचिव तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांच्यासह तज्ज्ञ डॉ. योगेंद्र नेहते, डॉ.पूर्वा मणेरीकर, डॉ.अक्षय सरोदे, डॉ.धमेन्द्र पाटील, डॉ.शिवहर जनकवाडे, डॉ. नेहा चौधरी यांनी दिव्यांगांची तपासणी केली. कर्मचारी चेतन निकम, दत्तात्रय पवार, विशाल दळवी, आरती दुसाने, प्रकाश पाटील, अजय जाधव, विश्वजीत चौधरी यांनी सहकार्य केले.

दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी शासकीय संकेतस्थळ (www.swavlambancard.in) येथे जाऊन (Apply for Disability certificate & UDID card) या लिंकवर जाऊन अर्ज भरणे आवश्यक आहे. तेथे प्रमाणपत्र नूतनीकरणची देखील लिंक उपलब्ध आहे. या अर्जाची प्रिंट काढून दिव्यांग विभागातून बुकिंग कुपन घ्यावे. कूपनवर दिलेल्या तारखेला अर्जासह आधारकार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट २ फोटो व जुने दिव्यांग प्रमाणपत्र तथा संबंधित कागदपत्र घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे.

Related Articles

Back to top button