जळगाव जिल्हावाणिज्य

ग्राहकांसाठी सुवर्णसंधी! धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण ; पहा प्रति तोळ्याचा भाव?

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२३ । आज धनत्रयोदशी आहे. आजच्या दिवशी सोने खरेदी शुभ मानण्यात येते. याच परिस्थितीत सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी भारतीय सराफा बाजारात नरमाई दिसून येत असून आज शुक्रवारी सराफा बाजार घसरणीसह उघडला. सणासुदीत भाव घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. Gold Silver Rate Today

gold silver rate jpg webp

MCX वर सोन्या-चांदीची किंमत
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोने 117 रुपयांनी घसरून 60,165 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे, तर चांदीचा भाव 122 रुपयांनी घसरला असून 71,091 रुपये प्रति किलो झाला आहे.

जळगाव मधील दर
दरम्यान, जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याचा भाव 61 हजार रुपयांच्या आत आले आहे. गुरुवारी सोन्याच्या भावात 400 रुपयांची घसरण होऊन ते 60 हजार 600 रुपये प्रतितोळ्यावर आले. तर दुसरीकडे चांदीच्याही भावात 500 रुपयांची घसरण झाली व ती 71 हजार 200 रुपये प्रतिकिलोवर आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button