जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२५ । पाचोरा (Pachora) जवळील परधाडे (Pardhade) रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या भयंकर अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला असून एकूण २० ते २५ प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान परधाडे येथे झालेल्या रेल्वे अपघाताची ‘सीआरएस’ ही उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. मुंबई (Mumbai) येथील मुख्य सुरक्षा आयुक्त गुरुवारपासून ही चौकशी सुरू करतील. त्यात प्रामुख्याने अपघाताचे मूळ कारण आणि त्यात दोष कुणाचा आहे? याचा शोध घेतला जाईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. Pachora Railway Accident

धावल्या. या गाड्या भुसावळ ते चाळीसगाव सेक्शनमध्ये विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या. अप मार्गावर लेट झालेल्या गाड्यांमध्ये सीतापूर सुपरफास्ट एक्स्प्रेस, हरिद्वार एक्स्प्रेस, बडनेरा नाशिक मेमू, गितांजली एक्स्प्रेस, तर डाऊन मार्गावरील कर्नाटक एक्स्प्रेस, गोदान, संपर्कक्रांती, मुंबई आसनसोल एक्स्प्रेस विलंबाने धावली. घटनास्थळावरून मुंबईकडे जाणारी पुष्पक एक्स्प्रेस सायंकाळी ५.१७ वाजता परधाडेकडून चाळीसगावकडे रवाना झाली. तर कर्नाटक एक्स्प्रेस सायंकाळी ६.०३ वाजता जळगावकडे रवाना झाली. यानंतरच दोन्ही मार्ग वाहतुकीला खुले झाले.
सहा ठिकाणी सुरू केले चौकशी कक्ष
अपघातामुळे विभागातील सहा रेल्वे स्थानकांवर चौकशी कक्ष सुरू करण्यात आले. यात भुसावळ येथे ८७९९९८२७१२, जळ ८७९९९५२५१९, मनमाड > र ७४२००५८५५६, बऱ्हाणपू ८२६३९१६३१४, खंडवा स्टेशन ८२६३९१६२९६ आणि नाशिक रोड स्थानकावर ८६००३११८५० असे हेल्पलाइन क्रमांक रेल्वेने जाहीर केले