राजकारणधरणगाव

ज्यांना बोट धरून शिकवले तेच आज आमच्यावर टीका करताय – एकनाथराव खडसे

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । ज्या लोकांना मी बोट धरून राजकारणात आणले तेच आता माझ्यावर आणि विशेष करून शरद पवारांवर टीका करत आहेत. आज अशांना इंगा दाखवायची वेळ आली आहे. वळसे पाटील साहेब तुम्ही जरा कडक भुमिका घ्या,इंगा दाखवा असा सल्ला एकनाथराव खडसे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिला.

eknathrao khadase jpg webp

धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे दिवंगत माजी आमदार मुरलीधरअण्णा पवार यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा दि.१५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खा.शरद पवार यांच्या सोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, सार्वजनीक बांधकाम राज्यमंत्री दत्ता भरणे, जैन समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा राष्ट्रवादीचे निरिक्षक अविनाश आदीक, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील आदींसह अन्य मान्यवर देखील चांदसर येथील कार्यक्रमाला उपस्थित होते.

एकनाथराव खडसे म्हणाले, अण्णांचे आणि पवार साहेबांचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध होते. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलविण्याचे काम पवार यांनी केले. अचूक निर्णय घेण्याची क्षमता असलेले ते एकमेव नेते आहे. पारिवारिक संबंध जोपासण्याचे काम त्यांनी केले. लहान कार्यकर्त्यांना देखील मोठे केले. एक घट्ट पारिवारिक नटे जोडले. मी आमदार असताना जे काही काम केले त्या कामांचे त्यांनी कौतुक केले. विरोधकांच्या कामाची स्तुती करणे हे मोठे मन त्यांचे होते. अलीकडच्या काळात विरोधकांचे तोंड दाबण्याचे काम होत असल्याची टीका देखील त्यांनी केली.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Related Articles

Back to top button