⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

मराठा आरक्षणांबाबत एकनाथ खडसेंनी घेतली राज्य सरकारची बाजू

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२१ । मराठा आरक्षण असो की ओबीसी आरक्षण असेल किंवा नव्याने कोणते आरक्षण द्यायचे असेल तर यासंबधी निर्णय घेण्याचे सर्व अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यामुळे आता मराठा व ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारवर दबाव आणावा लागेल. यासाठी सर्वांनी एकजूट करण्याची गरज आहे,” असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे  यांनी केले आहे. ते जळगाव येथे माध्यमांशी बोलत होते.

एकनाथ खडसे म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळालाच पाहिजे. मराठा समाजात एक वर्ग गरीब आणि मध्यम वर्गीय असून ती हलाखीचे जीवन जगतो आहे, त्यांना आरक्षणाचा लाभ मिळालाच पाहिजे. आरक्षणाची मागणी राज्य सरकारकडे करून उपयोग नाही, आता १०२ वी घटना दुरुस्ती झाल्याने याचे सर्व अधिकार आता केंद्र सरकारकडे गेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला याबाबत कोणतेही निर्णय घेता येणार नाहीत, आता याचे संपूर्ण अधिकार केंद्र सरकारला आहेत, असंही खडसे म्हणाले.