मोठी बातमी : १७ मे रोजी सुप्रिया सुळे जळगाव दौऱ्यावर

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे १७ मे रोजी जळगाव दौर्‍यावर येणार आहेत. ज्यावेळी त्या दिवसभर जळगाव शहरात विविध कार्यक्रमात प्रत्यक्ष भाग घेणार आहेत. याच बरोबर मुक्ताईनगर येथे एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी जाऊन खडसे यांची भेट घेणार आहेत. सुप्रिया सुळे यांच्या जळगाव दौऱ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

supriya sule jalgaon jpg webp

17 मे रोजी सुप्रिया सुळे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार असून सकाळी ९.३० वाजता चार्टर्ड अकाउंटंट संघटनेशी बैठकीमध्ये चर्चा करणार आहेत. त्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटर व यशस्विनी सामाजिक अभियान बैठकीचे आयोजन रोटरी हॉल येथे करण्यात आले आहे. २.३० वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन झाल्यावर त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. नंतर त्या मुक्ताईनगरला जाऊन एकनाथराव खडसे यांच्या घरी त्यांची भेट घेणार आहेत.

सुळे- खडसे भेटीमुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाला काय वळण मिळतं ? हे पाहायला सर्वांनाच उत्सुकता आहे. येत्या काळात जळगाव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा लागणार आहे. यामुळे ही बैठक प्रचंड महत्वाची असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now