जळगाव जिल्हा

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयातील बायोकेमेस्ट्री विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रणधीर कुमार पांडे यांना निम्स विद्यापीठ जयपूर राजस्थान यांच्यामार्फत मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.

Dr. Randhir Kumar

डॉ. पांडे यांनी डॉ. माधुरी गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन कार्य यशस्वीरित्या पूर्ण केले.त्यांच्या संशोधन प्रबंधाचे शीर्षक होते. ‘सामान्य रक्तदाब आणि उच्च रक्तदाब असलेल्या ’टाइप २’ मधुमेह रुग्णांमधील मायक्रोअल्ब्युमिन्युरिया आणि सी-रिअ‍ॅक्टिव्ह प्रोटीन यांचा सहसंबंध.‘या संशोधनामध्ये टाइप-२ मधुमेह असलेल्या सामान्य रक्तदाब (सामान्य रक्तदाब असलेला) आणि उच्च रक्तदाब (उच्च रक्तदाब असलेला) असलेल्या रुग्णांमध्ये मायक्रोअल्ब्युमिन्युरिया आणि सी-रिऍक्टिव्ह प्रोटीन (सीआरपी) यांमधील परस्परसंबंधाचा अभ्यास करण्यात आला.

या संशोधनामुळे मधुमेहाशी संबंधित मूत्रपिंडाच्या सुरुवातीच्या गुंतागुंती तसेच हृदयविकाराचा धोका ओळखण्यासाठी या जैवरासायनिक निर्देशकांचे महत्त्व अधोरेखित झाले असून, रुग्णांचे लवकर निदान आणि प्रभावी उपचार नियोजन करण्यास मदत होणार आहे.डॉ. पांडे यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल सहकारी, विद्यार्थी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button