चोरीच्या १३ मोटारसायकल जप्त

सप्टेंबर 24, 2021 1:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज ।२४ सप्टेंबर २०२१।  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पहूर येथे चोरीच्या १३ मोटारसायकल जप्त केल्या. येत्या काळात अजून काही मोटारसायकल जप्त  होणार आहे.

पहूर परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये मोटरसायकली चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून यामुळे दुचाकी धारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत पहूर येथून सुमारे १३ मोटरसायकली ताब्यात घेऊन त्या अजिंक्य हॉटेल येथे आणून  जळगावला हलविण्यात आल्या आहेत .तसेच आणखी काही मोटारसायकली ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.  यापूर्वीही सहा महिन्यांपूर्वी जुगार अड्ड्यांवर मोठ्या प्रमाणात चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या होत्या. आज झालेल्या कारवाईने जुगाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारवाईमुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now