महाराष्ट्रजळगाव जिल्हाराजकारण

Pachora Politics : ना शिवबंधन, ना शिंदेबंधन.. भाऊ-बहिणीचे रक्षाबंधन

किशॊर PATIL AND SISTER

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२२ । राज्यात शिवसेनेत फूट पडल्यावर अनेक ठिकाणी कुटुंबात देखील राजकीय फूट पडल्याचे पहावयास मिळाले. पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी शिंदे गट तर त्यांची चुलत बहिण वैशाली सुर्यवंशी यांनी मातोश्रीची वाट निवडली. दोघांनी राजकारणात जरी वेगवेगळ्या वाटा निवडल्या असल्या, तरी मात्र भाऊ आणि बहिणीचं नातं जपल्याचं आज रक्षाबंधन सणाच्‍या दिवशी पहायला मिळाले. बहीण वैशाली सुर्यवंशी यांनी भाऊ आमदार किशोर पाटील यांच्या निवासस्थानी जात त्यांना राखी बांधत शिवबंधन आणि शिंदेबंधनपेक्षा रक्षाबंधन श्रेष्ठ असल्याचे दोघांनी दाखवून दिले.

राज्यात शिवसेना फुटल्यानंतर अनेक कुटुंबात देखील दोन गट निर्माण झाले. एकाच कुटुंबातील असताना एक शिवसेनेसोबत तर दुसरा एकनाथ शिंदेंसोबत असल्याचे पाहायला मिळाले. पाचोरा येथील आमदार किशोर पाटील हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असल्याचे सर्वांना माहितीच होते. आ.पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तर त्यांचे काका माजी आ.आर.ओ.तात्या यांची कन्या वैशाली सुर्यवंशी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी निष्ठा कायम राखत त्यांना मातोश्रीची वाट धरली. राजकारणात जरी वेगळी वाट असली तर दोघांनी भाऊ बहिणीचं नातं जपल्याचं आज पहायला मिळालं.

रक्षाबंधननिमित्त वैशाली सूर्यवंशी यांनी आ.किशोर पाटील यांना राखी बांधली. प्रसंगी बहीण वैशाली सुर्यवंशी यांनी भाऊ किशोर पाटील यांना पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले, तर भाऊ आमदार किशोर पाटील यांनीही बहिणी वैशाली यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याचं यावेळी पहायला मिळालं.

आ.किशोर पाटील यांनी, राजकारणात भावना चालत नाही. मात्र तरीही मी नातं सांभाळेन, मात्र माझे विचार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. मी त्या पद्धतीने सामोरे जाईन, आम्ही वेगवेगळ्या निवडणूका लढवू, मात्र बहीण भावाचं नातं सांभाळणार असल्याचे किशोर पाटील यांनी सांगितले होते. तसेच तिला राजकीय वाटचालीसाठी माझे आशीर्वाद आहेत, तसेच तिचे मला आशीर्वाद आहेत, असेही ते म्हणाले होते.

Related Articles

Back to top button