जळगाव जिल्हाजळगाव शहरशैक्षणिक

रायसोनी महाविद्यालयात ब्लॉक चेन : युस केसेसवर कार्यशाळा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२२ । रायसोनी महाविद्यालयात संगणकशास्त्र व विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्सच्या अंतर्गत ब्लॉक चेन टेक्नोलॉजी या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. त्यात ब्लॉक चेन नेटवर्क, पब्लिक ब्लॉक चेन, प्रायव्हेट ब्लॉक चेन, कन्सोर्ठीयम ब्लॉक चेन आणि हायब्रीड ब्लॉक चेन या विविध विषयावर एमरटेक इनोव्हेशन्सचे सीईओ गौरव सोमवंशी यांनी विध्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

gourav samvanshi jpg webp

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगणकशास्त्र, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा. सोनल पाटील, प्रा. स्वाती पाटील, प्रा. शीतल जाधव, प्रा. हिरालाल सोळुंखे, प्रा. शुभांगी वाघवते, प्रा. प्रेमनारायण आर्या यांनी सहकार्य केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगणकशास्त्र विभागाची विध्यार्थिनी शाहनवाज सय्यद, श्रुती बडगुजर यांनी केले. सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इंस्टीट्यूटचे संचालक प्रीतमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, डीन प्रा.डॉ. प्रणव चरखा यांनी कौतुक केले.

Related Articles

Back to top button