सोमवार, डिसेंबर 4, 2023

पप्पा मम्मी सॉरी.. सुसाईट नोट लिहून उच्चशिक्षित तरुणीचं टोकाचं पाऊल, जळगावातील घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२३ । जळगाव शहरातील रौनक कॉलनीतील कोमल वसंत भावसार (30) या उच्चशिक्षित तरुणीनं घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, आत्महत्येचे कारण कळू शकले नसून मात्र पोलिसांनी कोमलच्या लॅपटॉपच्या बॅगमध्ये सुसाईट नोट आढळून आली आहे. पोलिसांनी लॅपटॉप आणि सुसाईट नोट जप्त केली.

शहरातील रौनक कॉलनीत कोमल भावसार ही वास्तव्यास असून ती बँकेत अकाऊंटन म्हणून नोकरीला होती. दरम्यान, कोमलचे आई आणि भाऊ पुण्यात गेले आहे तर वडील कंपनीत कामाला जातात. कोमल बँकेत कामाला जाणार होती. मात्र वडील कामावर जाताच कोमल भावसारने आत्महत्या केली.

सायंकाळी तीचे वडील कामावरुन घरी परतले असता, त्यांना आपली मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. मुलीचा मृतदेह बघताच त्यांनी एकच आक्रोश केला.

दरम्यान पोलिसांना कोमलच्या लॅपटॉप बॅगमध्ये सुसाईट नोट मिळाली आहे. त्यात मम्मी पप्पा सॉरी, मी स्वतःच आत्महत्या करीत आहे. कुणालाही जबाबदार धरू नये. अशा आशयाचा मजकूर चिट्ठीत मांडल्याचे दिसून आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात