---Advertisement---
जामनेर

तोंडापूर पिडीतेच्या न्यायासाठी तडवी महिला मंडळाचे साकडे

---Advertisement---

Tondapur News-जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२२ । जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील एका अल्पसंख्यांक आदिवासी महिलेसोबत झालेल्या अत्याचार प्रकरणी पहूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध अत्यंत साध्या कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. सदर प्रकरणी गंभीर स्वरूपाचे कलमा अनव्ये गुन्हा दाखल होणे आवश्यक असून पुरवणी कलम लावा, सदर तपास महिला पोलिस अधिकाऱ्या मार्फत करावा, आरोपीस त्वरित अटक करावी. अत्याचार पिडितेला शासनातर्फे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे, एवढेच नव्हे तर सदर प्रकरणाचा सविस्तर तपास करून १५ दिवसाच्या आत न्यायालयात दोषारोपण पत्र सादर करावे व हे प्रकरण जलद न्यायालयात चालवुन आरोपीस कड़क शिक्षा करण्यात यावी अशी एक मुखी मागणी जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे आदिवासी तडवी महिला मंडळातर्फे करण्यात आली आहे. दरम्यान, सदर मागण्या ३ दिवसात मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे सुद्धा निवेदनात म्हटले आहे.

jalgaon 2022 09 13T184222.033

यावेळी मनियार बिरादरी चे अध्यक्ष फारूक शेख यांच्या नेतृत्वात आदिवासी तडवी महिला मंडळाचे अध्यक्ष रफीया बाबू तडवी, उपाध्यक्ष छाया कुंदन तडवी, राष्ट्रवादी प्रदेश सचिव प्रतिभा शिरसाठ,अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या नसरून सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, रिटायर डेप्युटी कमिशनर जीएसटी एन ए तडवी, रिटायर ट्रेझरी ऑफिसर बाबू इस्माईल तडवी ,काँग्रेस आयचेअल्पसंख्यक अध्यक्ष अमजद पठाण, ह्यूमन राइट चे अनवर खान, तड़वी आदिवासी महिला मंडळाच्या नजमा बी शेख, आलिशान बशारत, अरुणा खुदा बक्श तडवी,हमीदा बाबू, चारुलता सोनवने, मंजुबाई फिरोज तडवी, आबेदा सलीम तडवी, तसलीमा अजित तडवी, फिरदौस तडवी, शिवसेनेच्या गायत्री सोनावणे व चारुलता सोनावणे आदी उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---