जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । आमच्या मुलीला तुमच्या मुलाने पळवून नेल्याचा आरोप करत मुलगी दोन तासात परत आली नाही तर घर जाळून टाकण्याची धमकी, शिवीगाळ व लोखंडी पाईपाने मारहाण करणा-या पाच जणांविरुद्ध महिलेच्या जवाबानुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन सर्वानंद राजपाल, रोश सर्वानंद राजपाल, मुन्ना सर्वानंद रजपाल, अंजु शंकर राजपाल, करू मुन्ना राजपाल सर्व रा. सिंधी कॉलनी जळगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहराच्या सिंधी कॉलनी परिसरात 15 फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी पाच जणांच्या मारहाणीत महिला जखमी झाली आहे. महिलेचे घर जाळून टाकण्याच्या उद्देशाने पुन्हा आलेल्या आरोपींनी सोबत रॉकेल आणल्याने तणाव निर्माण झाला होता.
संपूर्ण प्रकार दि.१४ रोजी दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडला. घटनास्थळी फौजदार अनिस शेख यांनी भेट देत तणावपुर्ण परिस्थिती आटोक्यात आणली. सहायक फौजदार राजेंद्र उगले यांनी सदर गुन्हा दाखल केला असून पो.नि.प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. प्रमोद कठोरे पुढील तपास करत आहेत.
हे देखील वाचा :
- खान्देशात ठाकरे गटात मोठा भूकंप; 52 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, भाजप उमेदवाराला पाठींबा देणार
- लाडक्या बहिणींनी आमदार भोळे यांना ओवाळून विजयासाठी दिल्या सदिच्छा
- डोनाल्ड ट्रम्प होणार पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष; भारतावर काय परिणाम होईल? जाणून घ्या 10 मोठ्या गोष्टी
- बाबा.. रावेर-यावलच्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त होऊ द्या! अनिल चौधरी साई बाबा चरणी लीन
- लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची अत्यंत मोठी घोषणा; वाचा काय आहे?