बालिकेचा विनयभंग करणाऱ्या चाळीसगावातील संशयितास अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । अंगणात खेळणाऱ्या ६ वर्षांच्या बालिकेला घराबाहेर असलेल्या बाथरूमध्ये नेऊन,तिच्याशी अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ३० रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.

crime 2022 06 01T115207.829

याप्रकरणी काल्या उर्फ फारूक शेख फकीरा शेख याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित बालिका घराबाहेर खेळत असताना, काल्या उर्फ फारूक शेख फकिरा शेख याने त्या बालिकेला घराबाहेर असलेल्या बाथरूममध्ये नेऊन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडित बालिकेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून, काल्या उर्फ फारूक शेख फकीरा शेख याच्याविरूद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला पोस्को कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now