दुचाकी लांबविणारा संशयित जेरबंद
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । एमआयडीसी परिसरातील हॉटेल निलांबरी येथून दुचाकी लांबीवणारा संशयित आरोपी सॅलविन विरेंद्रसिंग ठाकूर (वय-३५) याला एमआयडीसी पोलीसांनी आज पहाटे कालिका माता परिसरातून अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की, मंगल पुंडलिक पाटील (वय ५४, रा. श्रीराम समर्थ कॉलनी, पिंपळा, जळगाव) हे गणपती घेण्यासाठी मुलगा सेजस पाटील यांच्यासह मोटरसायकल क्रमांक (एमएच १९ बीएक्स ७९२) २२ ऑगस्ट २०२० सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील तोल काटा जवळील हॉटेल निलांबरीजवळ आले होते. त्यांनी दुचाकी पार्किंग करून गणपती घेण्यासाठी गेले. गणपती घेऊन ६.३० वाजेच्या सुमारास पुन्हा पार्किंग लावलेल्या दुचाकीजवळ आले असता दुचाकी मिळून आली नाही, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला होता. या गुन्ह्यातील फरार असलेला संशयित आरोपी सॅलविन विरेंद्रसिंग ठाकूर (वय-३५) रा. गांधी नगर, गोपाल नगर, भुसावळ या गुरुवार २७ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता कालिंका माता परिसारातून एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी या गुन्ह्यात मुकूदा डिगंबर सुरवाडे या संशयिताला अटक केली होती.
ही कारवाई यांनी केली
पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदान आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, पोहेकों संजय धनगर, विकास सातदिवे, हेमंत कळसकर, सुधीर सावळे, योगेश बारी, चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.
हे देखील वाचा :
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- Pachora : वाळू माफियांकडून महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, चौघांना अटक
- धक्कादायक ! अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, रुग्णालयात दाखल