⁠ 
शनिवार, सप्टेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | आजचा यावल येथील आठवडे बाजार रद्द

आजचा यावल येथील आठवडे बाजार रद्द

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२४ । बांगलादेशातील हिंदू समुदायावर करण्यात येत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आज देशव्यापी बंदची हाक देण्यात आलेली आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी होणारा यावल येथील आठवडे बाजार रद्द करण्यात आल्याचा महत्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

आजच्या देशव्यापी संपाचा मोठा व्यापक परिणाम होण्याची शक्यता आहे. याची दखल घेऊन यावल येथे दर शुक्रवारी भरविण्यात येणारा आठवडे बाजार आज बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यावलच्या आठवडे बाजारात आपली कृषी उल्पादने विक्रीसाठी आणणारे शेतकरी व व्यापाऱ्यांनी याची नोंद घेण्याचे तसेच नागरिकांनी याची दखल घेण्याचे आवाहन देखील नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, आजच्या देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर, कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांनी तातडीची बैठक घेऊन या संदर्भात पोलीस प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.