Exclusive : सुरेशदादांच्या भेटीला पोहचले जळगावचे भाजप आमदार

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२२ । जळगाव शहराचे आ.राजूमामा भोळे हे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. आ.भोळे आणि जैन यांचीही भेट भविष्यातील काही राजकीय संकेतांचे सूचक मानले जात आहे.

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना घरकूल प्रकरणात नियमीत जामीन मंजूर झाला असून दोन दिवसांपूर्वीच ते जळगावात आले आहेत. सुरेशदादा जैन यांच्यावर प्रेम करणारे विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी त्यांच्या भेटीसाठी जात आहेत. गुरुवारीच पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी देखील भेट घेत सुरेशदादा जैन यांनी राजकारणात सक्रिय होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

शुक्रवारी दुपारी जळगाव शहराचे आ.राजुमामा भोळे हे देखील सुरेशदादा जैन यांच्या भेटीला पोहचले आहेत. जळगाव शहरातील सुरेशदादा जैन यांच्या सत्तेला ब्रेक लावण्याचे काम आ.भोळे यांनी केले आहे. दोन विधानसभा निवडणुकीत आ.भोळे यांनी जैन यांचा पराभव केला आहे. सध्या सुरेशदादा जैन हे ठाकरे गटाच्या शिवसेनेत असून भाजप आ.भोळे हे भेटीसाठी पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.