जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जून २०२१ । जळगाव शहरातील गोपाळपुरा भागांमधून दोन मुलांना घेऊन एका भामट्याने पलायन केले होते. पोलीस पथक त्या भामट्याच्या कसून शोध घेतला असता अंमळनेर जवळ सुरेश दाभाडे यांनी त्या भामट्याच्या कडून सुटका करत या मुलांना पोलिसांच्या स्वाधीन केले.
अतिशय जिकिरीचे प्रयत्न करत सुरेश दाभाडे यांनी आपल्या जीवावर खेळून या मुलांची सुटका करत शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने सुरेश दाभाडे यांनी केलेल्या कार्याचा याप्रसंगी गौरव करत त्यांचा शाल व श्रीफळ देऊन या प्रसंगी गौरव करण्यात आला.
आम्हाला अभिमान आहे की आमच्या समाजाच्या एका तरुणाने त्या मुलांची सुटका करत त्या भामट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी समाजाचे प्रदेश महामंत्री व अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे दिलीप अन्ना चांगरे, सुनील पवार, संजय संकत, रामजी पवार, सूरज पवार, रोहित पवार, मोहन करोसिया, प्रकाश संकत, घनशायम चावरीय, विक्रम सारवान, आदींच्या उपस्थितीत यावेळी गौरव करण्यात आला.